Saturday, June 21, 2014

हातभार

हातभार

आपण आपल्या रोजच्या जीवनामधे आपल्या स्वभावाबद्दल किंवा एकून वर्तनाबद्दल कधी गंभीर असतो का ? या प्रश्नाच उत्तर आपल्याला कदाचित नाही देता येणार..!                                                                                  पण आपण कितीही नाकारलं तरी आपल्या स्वभावावर आजुबाजुच्या लोकांचा मोठा परिणाम होत असतो. आपलं व्यवस्थित राहाणे किंवा अव्यवस्थित राहाणे बर्‍याच अंशी आपल्या आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असतं.थोडक्यात आपल्या आजुबाजुच्या व्यक्ति आपल्याला बदलायला भाग पाडतात, मग बदल चांगला असेल किंवा वाईट.
      समाजातला प्रत्येक माणूस जरी स्वतंत्रपणे जन्माला आला असला तरी त्याच्या जडणघडणीत मध्ये समाजाचा मोठा हातभार असतो. शहरातल्या पांढरपेशा लोकांकडे बघून पण आपण अनुमान लावू शकतो की स्वच्छ अन व्यवस्थित कपड्यामंधे ही लोक जिकड तिकड़ वावरत असतात,याच कारण त्यांच्या आजुबाजुचा समाज अन त्यांच्या सोबतच्या सगळ्या लोकानी अंगीकारलेल रहाणीमान. 

माझा उद्देश सगळ्यानी पांढरपेशा लोकांसारख स्वच्छ अन नीटनेटक रहाणीमान स्वीकाराव असा नाही हे फ़क्त एक सामान्य उदहारण आहे .

विषय छोटा पण गंभीर आहे अन इतक सगळ लिहाण्याचा उद्देश वेगळा आहे. 

     तर घटना अशी आहे की एका संध्याकाळी असाच फेरफटका मारत असताना कट्ट्यावर २ ,३ बुजुर्ग लोक बीडी (मॉडर्न वाचकांसाठी सिगरेट) ओढत मस्त थंड गारव्यात गप्पा ठोकत बसली होती. बाजुलाच गावातली लहान टारगट पोर असच खेळत बसली होती अन बुजुर्ग लोक बीडी ची थोटक रस्त्यावर फेकण्यात गुंग होती.
    दुसर्‍या दिवशी दुपारी असच त्याच ठिकाणी पुन्हा जाणं झाले पण यावेळी मात्र बुजुर्ग लोक तिथे न्हवती ,पोर मात्र तिथेच खेळत होती. पण!!!!!!!!! आज मात्र पोरांचा  खेळ बदलला होता.आज ती पोर रस्त्यात टाकलेली सिगरेटची थोटकं तोंडात घेउन ती पेटवण्यात गुंग होती.
बाजूच्याच घरातील एका व्यक्तिच पोरांकडे लक्ष गेले अन याचे पडसाद म्हणून पोरांनी पोट भरून मार खल्ल्ला.अन सगळ्या  वाईट वर्तणुकीचे खापर पण पोरांच्याच माथी फोडण्यात आलं.
   तिसर्‍या दिवशी त्याच कट्ट्यावर त्याच बुजुर्ग लोकांची पोरांनी काल केलेल्या ‘अघोरी’ कृत्याबद्दल चर्चा चालू होती.
    एक बुजुर्ग म्हणताहेत  “आजकाल च्या पोरांच काहीच सांगता येत नाही ,काय करतील अन काय नाही याचा नेम नाही”.अन परत बीडी शिलगावून यांच्या रोजच्या चर्चेला उधान येत ..पोरांनी केलेल्या अघोरी कृत्याबद्दल पोरांना दोष देऊन पुन्हा त्यांच्या निवांत आयुष्याला सुरवात होते....किती विचित्र आहे नाही ...   

   चड्डी नीट घालता न येणार्‍या पोरांना सिगरेट तोंडात धरायची असते हे शिक्षण द्यायला कोण देव आला होता का..पोरांना हे समजायला किती तरी वर्षे लागली असती पण स्वतःला बुजुर्ग म्हणून घेणार्‍या या महाभागांनी त्यांना हे आजाणत्या वयात शिकवल ..वर त्यांच्या अशा वर्तनाच खापर त्यांच्या अन आजकल बदललेल्या परिस्थितीवर फोडून रिकामे झालेत हे लोक ...आजचा काळ असा बदलायला स्वतःचाच  हातभार लागलेला आहे हे किती सहज विसरतात ही लोक ..

  माझ्या तमाम मित्रांना ,हितचिंतकांना मला हे सांगायच आहे की यापुढे समाज घडायला किंवा बिघडायला तुम्ही स्वतःच जबाबदार असाल हे लक्षात ठेवा...अन  आता  नवीन चांगला समाज घडायला तुमच्या हातभाराची गरज आहे हे लक्षात ठेऊन समाजातलं आपल वर्तन जितक सुधारता येइल तितक सुधारा जेणेकरून तुमचं समाजाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण होइल....अन नवीन आरोग्यदायी ,सुसंकृत समाज निर्माण होईल .....   

1 comment: